महागाव नगरपंचायतीत सत्तासंघर्ष टोकाला अविश्वास ठरावासाठी ११ नगरसेवक यवतमाळच्या दिशेने; राजकीय वातावरण तापले

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क /०९ फेब्रुवारी 

 महागाव :

महागाव नगरपंचायत सभागृहातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून विद्यमान नगराध्यक्ष सौ. सुनंदाताई दिलीपराव कोपरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नगरपंचायतीतील तब्बल ११ नगरसेवक यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अविश्वास ठरावासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी जिल्हा स्तरावर धाव घेतल्याने महागावच्या राजकीय व शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरपंचायत कारभारावरून सुरू असलेली नाराजी आता उघड संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नुकत्याच घडलेल्या चार पासून उपनगराध्यक्षांच्या ड्रामेबाज ’अपहरणाचा एक अध्याय संपला असला तरी त्या संदर्भातील पोलीसी कारवाई अद्याप सुरूच असल्याने राजकीय वातावरण अधिकच अस्थिर झाले आहे.या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अविश्वास ठरावाची वेळ आणि हालचाली यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.महागाव नगरपंचायतीत सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पष्ट रेषा आखल्या गेल्या असून पुढील काही दिवसांत नगरपंचायतीच्या राजकारणाला नेमके कोणते वळण मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

महागावच्या राजकीय नौटंकीचा पुढील अंक काय असेल, हे येणारा काळच ठरवेल,मात्र सध्या तरी नगरपंचायत राजकारण ऐन उफाळ्यावर असल्याचे स्पष्ट आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या