एकवीस हजारांची मदत नव्हे, तर धडधडणाऱ्या भविष्याची हमी ! विलास पवार यांच्या माणुसकीने यशच्या आयुष्याला आशेचा नवा श्वास

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क /० ८ फेब्रुवारी 

महागाव :

 

आजच्या स्वार्थी युगातही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. जिव्हाळ्याची भिंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हृदय प्रत्यारोपणासाठी संघर्ष करणाऱ्या यश रवींद्र शेंडे या चिमुकल्यासाठी २१ हजार रुपयांची मदत देताना विलास श्रीराम पवार यांचे मन भरून आले.ही मदत केवळ आर्थिक नव्हे, तर एका निरागस जीवाच्या धडधडणाऱ्या भविष्यासाठी दिलेला आधार आहे.आपल्या घरातील पोरगं वाचावं,त्याच्या आयुष्यात पुन्हा हसू यावं,अशी भावनिक प्रार्थना त्यांनी देवाच्या चरणी अर्पण केली.

महागाव शहराचे भूमिपुत्र आणि सध्या पांढरकवडा येथे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले विलास पवार हे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा नेते तसेच वडार समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी याआधीही महागाव तालुक्यातील उटी येथील एका गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलून त्याच्या आयुष्याला दिशा दिली होती.

गरिबी,आजारपण किंवा शिक्षणाची अडचण कुठेही माणूस अडखळताना दिसला,की मदतीसाठी धावून जाणे,हीच त्यांची ओळख बनली आहे.समाजासाठी झटणाऱ्या या उदात्त अंतःकरणाच्या व्यक्तिमत्त्वामुळे अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा उजेड पसरला आहे.आज यशसाठी दिलेली ही मदत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून,माणुसकी अजून जिवंत असल्याचा हा जिवंत पुरावा म्हटल्यास वावगे ठरू नये.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या