मध्यरात्री अंधारात पोलिसांचा उजेड माळरानात अडकलेल्या प्रवाशांसाठी महागाव–बिटरगाव पोलीस ठरले देवदूत

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव :- 

महागाव–बिटरगाव पोलिसांच्या समन्वयातून माणुसकीचे जिवंत उदाहरण समोर आले असून, मध्यरात्री निर्जन माळरानात अडकलेल्या प्रवाशांसाठी पोलीस खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहेत.अडचणीच्या क्षणी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून,प्रवाशांनी पोलिसांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.रात्रीचा घनघोर अंधार,आजूबाजूला सामसूम माळरान आणि अचानक स्कूल बसचे एकामागोमाग दोन्ही टायर पंक्चर झाले.बसमध्ये महिला व लहान मुले असल्याने क्षणातच भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्ता ओसाड,मदतीचा कोणताही मार्ग नसल्याने प्रवासी अक्षरशः अडकून पडले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास एका खाजगी कार्यक्रमानिमित्त पुसद येथे गेलेली स्कूल बस रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास गांजेगावकडे परतत असताना महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्जन माळरानात अचानक थांबली. बसचे दोन्ही टायर पंक्चर झाल्याने वाहन हलवणे अशक्य झाले.महिलांच्या अंगावर दागिने होते, तर लहान मुले अंधारामुळे प्रचंड घाबरली होती.

या घटनेची माहिती काही जागरूक नागरिकांनी तात्काळ बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाणेदार शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. दरम्यान ठाणेदार धनराज निळे यांनी त्वरित आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस नाईक सुनील माथणे व चालक विवेक पारडकर यांच्या मदतीने पोलिसांनी परिस्थिती हाताळली.मध्यरात्री पंक्चरचे दुकान मिळणे अवघड असतानाही पोलिसांनी स्वतः जाऊन दुकानदाराला उठवले, दुकान उघडून घेतले आणि बसचे दोन्ही टायर पंक्चर काढून घेतले.

जोपर्यंत बस पूर्णपणे दुरुस्त होऊन सुरक्षितपणे मार्गस्थ झाली नाही, तोपर्यंत पोलीस पथक घटनास्थळीच तैनात होते.आम्ही फार घाबरलो होतो,पण पोलिसांनी ज्या पद्धतीने धावून येत मदत केली,ते आमच्यासाठी देवदूतासारखे होते, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

महागावचे ठाणेदार धनराज निळे,बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली ही माणुसकी संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या