ढाणकी नगरपंचायतमध्ये सत्ता सर्वांची, मग विरोधात कोण ? शिवसेना (उद्धव–शिंदे), भाजप, काँग्रेस, एमआयएम सत्तेत;नागरिकांचा थेट सवाल निवडणूक संपली, आता जबाबदारी स्वीकारा,सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

ढाणकी :- 

 

ढाणकी नगरपंचायतमध्ये सध्या विरोधी पक्षच शिल्लक नसल्याचे राजकीय चित्र स्पष्ट होत असताना, तरीही शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी न लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नगराध्यक्षपदी, शिवसेना (शिंदे गट) उपनगराध्यक्षपदी, भाजपकडे सभापतीपद, भाजपपुरस्कृत अपक्ष तसेच एम.आय.एम.चे सभापती, तर काँग्रेसही शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी अशा परिस्थितीत मग विरोधात नेमकं कोण ? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून, सर्व सन्माननीय नगरसेवकांना एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “आज सर्वच पक्ष सत्तेत आहेत. निवडणूक झाली, विरोध संपला. आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून नगरीच्या विकासासाठी काम करा,अशी ठाम भूमिका नागरिक मांडत आहेत.राज्य व केंद्र सरकारमध्ये भाजप व शिंदे गटाची सत्ता असताना, त्या सत्तेचा लाभ ढाणकी शहरासाठी करून घ्यावा, नगरसेवकांनी एकत्रितपणे शासन दरबारी शहराच्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

मागील नगरपंचायत सभागृहाने सुचवलेली अनेक विकासकामे आज शहरभर सुरू असल्याचे वास्तव असताना, त्याच सातत्याने अमडापूर पाणीपुरवठा योजनेची मंजूर योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच अप्पर तहसील कार्यालय, ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय यांसाठी मागील सभागृहाने केलेल्या पाठपुराव्याला गती देत प्रत्यक्ष मंजुरी मिळवून घ्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

“उद्या तुम्ही असे म्हणू शकणार नाही की आम्ही सत्तेत नव्हतो,असा स्पष्ट इशारा नागरिकांच्या प्रतिक्रियांतून उमटत असून, या सर्व प्रश्नांवर नगरपंचायत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या