शहातून गावाकडे परतत असताना अज्ञात वाहणाच्या धडकेत दोघेजन ठार ; रात्रीच्या वेळी झाला अपघात , अपघातग्रस्त वाहन पसार !

⚫लोकवेध न्युज नेटवर्क

उमरखेड –

 शहरातून कामकाज अटोपूण गावाकडे जात असताना उमरखेड – पुसद राज्य मार्गावर कृषी महाविद्याल्याच्या जवळच्या दत्त मंदीर परिसर लगत अज्ञात वाहणाने दुचाकी स्वारास जबर धडक दिली यामध्ये अंबाळी येथील दोघाचा जागीच मृत्यु झाला ही घटणा १९ जानेवारी सोमवार रात्री ९ वाजता सुमारास घडली

            अंबाळी येथील विनायक काळे ( ३२ ) आणि चंद्रकांत कऱ्हाळे (२२) हे दोघे जन मोटार सायकल क्र . एम एच २९ सीएच ४०३७ ने उमरखेड वरून गावाकडे जात होते कृषी महाविदयाल्याच्या समोरील दत्त मंदीर परिसर लगत उमरखेड – पुसद राज्यमार्ग रस्त्यावर अज्ञात वाहनाने यांच्या मोटार सायकलला जबरदस्त धडक दिली रात्रीची वेळ असल्याने अत्याअवस्थ पडलेल्या मृतक विनायक व चंद्रकांत यांच्याकडे ये – जा करणाऱ्या वाहण धारकांच्या ही घटणा निर्दशणास आली त्यावरून घटणेची माहिती पोफाळी पोलीसात मृतक चे भाऊ परशराम काळे यांनी दिली मंगळवारी २० जानेवारी रोजी अपघातग्रस्ताचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरखेड या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले दोघे जन अपघातात मृत पावल्याने अंबाळी गावात मनसून्न करणारे दु: खाचे सावट पसरले होते या घटणेचा तपास पोफाळी पोलीस करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या