डांबरात नव्हे, भ्रष्टाचारातच रस्ता बुडलाय ! मारवाडी फाटा–रोहडा रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम, कोट्यवधींचा निधी मातीमोल

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

पुसद:-

तालुक्यातील माळ पठारावरील मारवाडी फाटा ते रोहडा या महत्त्वाच्या डांबरी रस्त्याचे काम सध्या सुरू असले तरी प्रत्यक्षात हे काम अत्यंत निकृष्ट, नियमबाह्य आणि संशयास्पद पद्धतीने होत असल्याचे चित्र समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता पुन्हा एकदा उखडून, तोच निकृष्ट प्रकार नव्याने राबवला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या रस्त्याच्या कामात जेसीबी मशीनने मातीमिश्रित गिट्टी टाकून, कोणतीही योग्य लेव्हलिंग न करता, त्यावर अत्यल्प प्रमाणात डांबर फवारून बारीक गिट्टीचा चुरा टाकला जात आहे. परिणामी हा रस्ता सुरुवातीपासूनच टिकाऊपणाऐवजी खड्ड्यांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मारवाडी फाटा ते मारवाडी गावाकडे जाणारा रस्ता याच पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने मारवाडी येथील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रस्ता बंद पाडला. त्यानंतर पुढील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असले, तरी तेही तितक्याच निष्कृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या गंभीर प्रकाराबाबत मारवाडी व रोहडा येथील नागरिकांनी दिनांक १६ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुसद येथे लेखी निवेदन देत इस्टिमेटनुसार दर्जेदार रस्ता तयार करण्याचे आदेश ठेकेदारास द्यावेत, अशी ठाम मागणी केली आहे.

निवेदनात स्पष्ट इशाराही देण्यात आला असून, रस्ता योग्य न झाल्यास शांततेत आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, मारवाडी फाटा ते पांडूंना केदारलिंग या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तो रस्ता थातूरमातूर केल्यामुळे आज सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने गांभीर्य न दाखविल्याने तोच ठेकेदारी पॅटर्न पुन्हा वापरला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

माळ पठारावरील ४२ गावांतील रस्त्यांची अवस्था देखील अशीच असून, रस्ते टिकाऊ न करता केवळ बिले काढण्यासाठी कामे केली जात आहेत, असा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. यामुळे संपूर्ण परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

—————————————————————————————

आधीच निधीअभावी ठेकेदार काम करत नाहीत. रस्ता खराब होत असेल तर आम्ही लक्ष देऊन तो चांगला बनवून देऊ. संबंधित ठेकेदार चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे.

उमाकांत गंगाराम कांबळे,

उपविभागीय अभियंता,साबा उपविभाग, पुसद.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या