महागावमध्ये अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलचा धुमाकूळ ? गोर-गरीबांची फसवणूक, बोगस कागदपत्रांद्वारे परवानग्या !

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव तालुक्यात ‘महाराष्ट्र मोटर ड्रायव्हिंग स्कूल या नावाने अनेक वर्षांपासून अनधिकृतरित्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण चालवून नागरिकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,यवतमाळ येथे शे.राजीक शे.युनुस आणि वसिफखा हाफीजखॉ पठाण या दोघांनी लेखी अर्ज देत संपूर्ण प्रकाराची चौकशी करून ड्रायव्हिंग स्कूल तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार,सदर ड्रायव्हिंग स्कूलने खोटे बोर्ड-बॅनर लावून गोर-गरीब नागरिकांकडून पैसे उकळले तसेच शासनाच्या मोफत प्रशिक्षण योजनांचा गैरवापर केला. याशिवाय, काही वर्षांपूर्वी एससी-एसटी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेंतर्गत बोगस अॅडमिशन दाखवून मोठ्या प्रमाणात लायसन्स व प्रशिक्षणाचे बिल काढल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. या, तक्रारीत आणखी गंभीर बाब मांडण्यात आली असून किसान मोटर ड्रायव्हिंग स्कूल, श्रीरामपूर या संस्थेनेही बोगस कागदपत्रांच्या आधारे परवानगी घेतल्याचा आरोप आहे. प्रशिक्षक म्हणून दाखवलेल्या अजहरखा अहेमदखान पठाण या व्यक्तीवर तेलंगणातील बेला पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही त्याचे कॅरेक्टर सर्टिफिकेट खोटे तयार करून दस्तऐवजांमध्ये जोडण्यात आल्याचा दावा आहे.

तक्रारदारांच्या मते, सध्या अमजदखॉन आयुबखॉन पठाण हे महाराष्ट्र मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे नाव वापरून तालुक्यातील नागरिकांची दिशाभूल करत असून आर्थिक लूट सुरू आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या