१ लाख २८ हजार तुपदीपांनी उजळणार मरसुळ–दत्तनगर ; साडेतीन कोटी नामस्मरण पूर्णत्वानिमित्त तीन दिवसीय दिपोत्सव

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड :- या गावात 

मरसुळ गावात साडेतीन कोटी नामस्मरणाच्या पवित्र संकल्पपूर्ती निमित्त दिनांक २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान भव्य व आध्यात्मिक वातावरणात १ लाख २८ हजार तुपदीप ज्वलनाचा सामूहिक दिपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी मरसुळ–दत्तनगर येथील भाविकांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात २ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने होणार असून, सायंकाळी महापूजेने धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होईल. ५ फेब्रुवारी गुरुवारी दत्तमहाराज, हनुमान व महादेव यांच्या अभिषेकानंतर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर गावातून पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात येईल.

सायंकाळच्या वेळेत प्रत्येक घरासमोर तुपदीप प्रज्वलन करून दिपोत्सव साजरा केला जाणार असून, रात्री ९ वाजता महापूजा झाल्यानंतर उत्तररात्री ते पहाटेपर्यंत नामसंकल्प उजळणी कार्यक्रम होईल. यावेळी गुरुवर्य भगवानगिरी महाराज यांच्या उपस्थितीत काकडा आरती संपन्न होणार आहे.

या दिपोत्सवाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे सलग सांप्रदायिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबविण्याची रूपरेषा आखण्यात आली असून, या उत्सवामुळे परिसरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होऊन सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास भजनी मंडळाचे ज्येष्ठ अभ्यासक व पदाधिकारी बबन शिरडकर, आनंदराव काकडे व अवधूत देशमुख यांनी व्यक्त केला आहे.मरसुळ,दत्तनगरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या अभूतपूर्व आध्यात्मिक उपक्रमाच्या प्रसारणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या