गोदावरी अर्बनचा थायलंडमध्ये अभ्यास दौरा ; २३ अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
नांदेड :—
गोदावरी अर्बन बँकेच्या नेतृत्व विकास कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे यश मिळाले आहे. या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या निवडक २३ अधिकाऱ्यांचा अध्ययन दौरा थायलंडमध्ये यशस्वीरीत्या पार पडला.
या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी ‘एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन’या आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेला भेट देऊन क्रेडिट युनियन व्यवस्थापन आणि जागतिक आर्थिक पद्धतींचा अभ्यास केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एलेनिटा व्ही. सॅन रोक आणि तंत्रज्ञान प्रमुख रणजीत हेट्टियाराची यांनी मार्गदर्शन केले.तसेच सेंट पीटर क्रेडिट युनियन संस्थेला भेट देतांना स्थानिक सहकारी बँकिंग, डिजिटल सेवा आणि ग्राहककेंद्री कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष समरोएंग बून-अरुणरक, कर्ज समितीचे अध्यक्ष सोमसोंग बून-अरुणरक आणि सर्व संचालक उपस्थित होते.
हा उपक्रम संस्थापक नामदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनातून, तसेच अध्यक्ष राजश्री पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनातून राबविण्यात आला. सचिव अँड. रविंद्र रगटे, प्रा. सुरेश कटकमवार, वर्षा देशमुख, सुमलता राव, उपसरव्यवस्थापक रवि इंगळे, विजय शिरमेवार यांच्यासह सर्व अधिकारी सहभागी झाले.या दौऱ्याचा उद्देश आधुनिक बँकिंग पद्धती, आर्थिक व्यवस्था, सहकार क्षेत्रातील नवकल्पना आणि डिजिटल व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अभ्यास करणे हा होता. अधिकाऱ्यांना थायलंडमधील आर्थिक व्यवहार, निसर्ग, इतिहास, फिनटेक प्रणाली आणि खाद्यसंस्कृतीबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे अधिकारी वर्गाची नेतृत्व क्षमता, निर्णय घेण्याची गुणवत्ता आणि बँकेच्या सेवांमध्ये अधिक सुधारणा होईल, असा विश्वास गोदावरी अर्बन बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
