प्रियंका पाटील यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदावर निवड

कौशल्य असेल तर यश अटळ !
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
यवतमाळ जिल्ह्याचा अभिमान वाढवत आसोली गावच्या कु. प्रियंका बाळासाहेब पाटील यांनी MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग-१) या मानाच्या पदावर निवड मिळवली आहे.
जयवंतराव पाटील यांच्या नाती व जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या कन्या असलेल्या प्रियंका यांनी कठोर परिश्रम,नियमित अभ्यास आणि योजनेबद्ध तयारीच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.प्रियंका यांच्या निवडीचा आनंद व्यक्त करण्यासाठी औषध संचालक संदीप वट्टमवार, शैलेश वट्टमवार, तसेच गव्हर्नमेंट ऑडिटर उत्तमजी वानखेडे, प्रशांत गावंडे यांनी पाटील परिवाराच्या घरी भेट देऊन प्रियंका यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
