कुटुंबातील लाडका चिमुकला चि. श्रवण नितीन नरवाडे याचा चौथा वाढदिवस आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरा होत आहे. या विशेष दिनानिमित्त त्याच्यावर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
श्रवणच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, ज्ञान, संस्कार, यश आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना कुटुंबीयांनी ईश्वरचरणी केली आहे. त्याच्या निरागस हास्याने आणि चंचल स्वभावाने सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
याप्रसंगी आई-वडील, मोठे बाबा-मोठी आई, नाना-नानी, आत्याबाई तसेच बहिणी-भावंडांनी श्रवणला प्रेमळ आशीर्वाद देत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल “लोकवेध न्यूज” परिवाराच्या वतीनेही चिमुकल्या श्रवण नितीन नरवाडे यास चौथ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्याच्या जीवनात यश, आनंद, उत्तम संस्कार आणि भरभराट लाभो, तसेच भविष्यात तो कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करो, हीच सदिच्छा.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद, चि. श्रवण!